पुलवामात चकमक; दोन दहशतवादी ठार, तर एक जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील पुलवामात दहशतवादी आणि लष्कारात चकमक उडाली असून तीन दहशतवादी ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. तर दहशतवाद्यांशी लढताना हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला असून दोन जखमी आहे. दरम्यान, चकमक अद्यापही सुरू असल्याचे कळते आहे.

पुलवामातील दलीपोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराच्या हाती लागली. गुरुवारी पहाटे लष्कराने या भागाला घेराव घातला. मात्र दहशतवाद्यांनी शरण न येता गोळीबार सुरू केला. अखेर लष्कराने चोख प्रत्त्युतर देत तीन दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत एक जवान शहीद झाला, तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.