
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी दलित साहित्य अकादमीच्या वतीने 2018 या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारचे वितरण रविवारी नवी दिल्लीत करण्यात आले. देशातील समाजसेवक, डॉक्टर, वकील, सिनेकलाकार आणि साहित्यकांना पुरस्काराने गौरवण्यात आले. हे या पुरस्काराचे 34 वे वर्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते उदय सर्वगोड आणि पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे यांना प्रदान करण्यात आले. हिंदुस्थानी दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, हिंदुस्थानी दलित साहित्य अकादमीचे ग्रेट ब्रिटनचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ.पी. आझाद आणि माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार नंदकिशोर मसुरकर आणि ग्लोरिया डिसोझा यांना प्रदान करण्यात आला.





























































