बिर्याणीची जात कंची? ‘दलित’ तरुणाला मारहाण

529

राजधानी दिल्लीच्या ग्रेटर नोएडा भागातील आंबेडकर मोहल्ला येथील व्हेज बिर्याणी विकणाऱया लोकेश या तरुणाने आपली जात ‘दलित’ सांगितल्यानंतर काही तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. ही दृश्ये दाखवणारा एक व्हिडीओच सध्या व्हायरल झाला आहे.

शुक्रवारी लोकेश हा नेहमीप्रमाणे बिर्याणी विकत होता. त्यावेळी तेथे काही तरुण आले. त्यांनी बिर्याणी घेतल्यानंतर खाता खाता त्याची जात विचारली. त्याने ‘दलित’ म्हणताच बिर्याणी फेकून देत या तरुणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. व्हिडीओवरून आता या तरुणांचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या