
जागतिक फॅशन तसेच आघाडीच्या ग्राहकोपयोगी ब्रँडसाठी उच्च दर्जाची उत्पादने पुरवणाऱ्या दालमियाने आतापर्यंत मिळालेल्या निधीच्या जोरावर 2025 पर्यंत रिसायकलिंग क्षमता तिप्पट करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. नवीन सुविधा आणि तंत्रज्ञानांच्या माध्यमातून तसेच मूल्यवर्धित उत्पादन श्रेणीच्या माध्यमातून हे उद्दीष्ट गाठण्यात येणार आहे. हिंदुस्थानातील कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंग उद्योगाच्या कायापालटाच्या उद्देशाने आपल्या 106 डॉलर्स निधीपैकी निम्मा निधी हिंदुस्थानात गुंतवण्याच्या हेतूने सर्क्युलेट कॅपिटलकडून हा निधी दालमियाला देण्यात आला आहे.
महासागरात प्लॅस्टिकच्या वाढता कचरा कमी करण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्क्युलेट कॅपिटल या सिंगापूरमधील व्यवस्थापन कंपनीने मुंबईतील दालमिया या आघाडीच्या पीईटी व पोलीओलिफिन रिसायकलर कंपनीमध्ये सर्क्युलेट कॅपिटलकडून ओशन फंडाद्वारे (सीसीओपफ) धोरणात्मक गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली. पेप्सीको, प्रॉक्टर अॅड गॅम्बल, डो, डेलोन, चॅनेल, युनिलिव्हर, दि कोका-कोला कंपनी आणि चेव्हरॉन फिलिप्स केमिकल्स यांच्या भागीदारीतून स्थापन झालेला सीसीओएफ हा दक्षिण तसेच आग्नेय आशियातील समुद्रांमधील प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला हा जगातील पहिला गुंतवणूक निधी आहे.
दालमिया उच्च दर्जाच्या रिसायकल पीईटी तसेच पोलिओलेफिनचे फ्लेक्स तसेच डोन्युजन्स दाणे निर्माण करते. त्यांचा उपयोग वस्त्रनिर्मिती आणि पॅकेजिंग उद्योगात होतो. दालमियाने 15 वर्षात 1,20, 000 मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग केले आहे. येत्या पाच वर्षात ही क्षमता तिप्पट करण्याची कंपनीची योजना आहे. दालमियाचे दर्जेदार साहित्य जागतिक रिसायकलिंग मानकांची त्याचप्रमाणे युरोपीय संघातील नियमांची पूर्तता करणारे आहे. त्याचप्रमाणे आयएसओचीही पूर्तता करणारे आहे.
दालमियाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य दालमिया या गुंतवणुकीबद्दल म्हणाले, हिंदुस्थानातील प्रमुख पीईटी रिसायकलर म्हणून आमचा भर नवे प्रयोग आणि तंत्रज्ञानावर असतो. यामुळे ग्राहकांना सतत दर्जेदार साहित्य पुरवण्याची क्षमता आमच्याकडे आहे. देशात या क्षेत्राचा विकास करण्याचे ध्येय आहे. सर्क्युलेट कॅपिटलच्या मदतीने आम्ही आमची रिसायकलिंग क्षमता वाढवणार आहोत.
सर्क्युलेट कॅपिटल मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब काप्लान या गुंतवणुकीसहल म्हणाले, प्लॅस्टिकचा पुन्हा वापर वाढून तसेच उपयोजन क्षमता विकसित करून रिसायकलिंग क्षेत्राचा कायापालट करण्यात दालमिया महत्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक मूल्य निर्माण करण्यासह कंपनीने स्थानिक समुदायांनाही मदत केली आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक तसेच सामाजिक कामांची निर्मिती होत आहे. आमच्या मदतीमुळे दालमियाला पुढीला वाटचालीसाठी मदत होणार आहे. हिंदुस्थानात वाढत्या कचऱ्यांची समस्या कमी होऊन अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे.




























































