वारी… विचार संस्कृतीचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वारी सोहळा संतांचा’ ही नृत्यनाटिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. 45 वारकऱयांनी एक विचार घेऊन वारीचा प्रवास सुरू केला आहे. आतापर्यंत कार्यक्रमाचे 15 प्रयोग झाले आहेत.

‘वारी सोहळा संतांचा’ एक नुसता मनोरंजनात्मक हेतूने तयार झालेला कार्यक्रम नसून तो एक विचार आहे. विचार आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या संस्कारांचा… ‘कृष्णाई इव्हेंटस् मुंबई’च्या ओंकार सावंत यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून ही नृत्यनाटिका साकारली आहे. प्रोइव्हेंटिज मुंबईच्या चेतन पडवळ आणि सागर जेठवा यांचे सहकार्य लाभले आहे. अर्चना सावंत आणि ओंकार सावंत यांचे नृत्यदिग्दर्शन तर सूत्रधार हरी पाटणकर व बाबू राणे आहेत.