
सामना ऑनलाईन । मुंबई
काही महिन्यांपूर्वी सोशल मिडीयावर डान्सिंग स्टार संजीव श्रीवास्तव यांच्या नृत्याची जोरदार चर्चा चालू होती. अभिनेता गोविंदा याच्या गाण्यावर गोविंदाप्रमाणेच नाचणाऱ्या संजीव यांनी स्वत: गोविंदा याने तारीफ केली होती. संजीव यांच्या नृत्यावर अर्जुन कपूर, अनुष्का शर्मासारखे कलाकार प्रचंड फिदा झाले होते. आपल्या बेफाम नृत्यामुळे रातोरात स्टार झालेल्या मध्य प्रदेशच्या गोविंदा काकांचं नशीब आता पालटलं आहे. संजीव श्रीवास्तव यांना अमेझॉन कंपनीने एका जाहिरातीमध्ये घेतलं असून ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
अॅमेझॉनची आलेली ही नवी जाहिरात ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची आहे. या जाहिरातीत संजीव श्रीवास्तव हे तू चीज बडी है मस्त मस्त या गाण्याच्या चालीवर बनवण्यात आलेल्या गाण्यावर नाचताना बघायला मिळतायत.





























































