दापोली – मुरूड किनारी बेवारस पोत्यात सापडले 40 लाखांचे चरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आज  एका पोत्यामध्ये सुमारे 40 लाख रुपये किमतीचे बेवारस चरस सापडल्याने खळबळ उडाली. ही घटना आज सायंकाळी चार वाजता घडली.
मुरुड समुद्रकिनारी एक बेवारस पोते आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी त्यांच्या पथकासह मुरुड येथे धाव घेतली, बेवारस पोते उघडून पाहिल्यावर त्यात 1150 ग्रॅम वजनाची 15 पाकिटे आढळून आली. पोत्यात अमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने दापोली पोलिसांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला.त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथक मुरुड येथे दाखल झाले त्यांनी तपासणी केली असता ते चरस असल्याचे निष्पन्न झाले. पंचासमक्ष पंचनामा करून ते जप्त करण्यात आले. ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आहिरे यांनी दिली, अशाच प्रकारचे पाकीट सौराष्ट्र (गुजरात) समुद्रकिनारी मिळाले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.