दापोलीत शिवसेनेचे योगेश कदम यांचा 13 हजार मतांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोलीत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम यांचा 13 हजार 731 मतांनी पराभव केला.

महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना 94 हजार 993 मते मिळाली.कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय कदम यांना 81 हजार 262 मते मिळाली.अटीतटीच्या लढतीत 33 वर्षीय योगेश रामदास कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम यांचा पराभव करत दापोली मतदारसंघावर भगवा फडकवला आहे.विजयानंतर फाटक्यांची आतषबाजी करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.