खग्रास चंद्रग्रहणानिमित्त श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाच्या वेळेत बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या मंगळवारी, 8 नोव्हेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) आहे. या दिवशी दुपारचा श्रींचा महानैवेद्य, रात्रीची आरतीची वेळ आणि गाभाऱ्यातून देण्यात येणाऱ्या दर्शनात बदल केले आहेत, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.

भाविकांना मंगळवारी पहाटे 3.15 ते 4.45 या वेळेत गाभाऱ्यातून श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येईल. त्यानंतर पहाटे 5 ते 5.30 या वेळेत आरती होईल. या दिवशी ग्रहणाचे वेध असल्याने दुपारी श्रींचा महानैवेद्य होणार नाही. दुपारी 2.15 पासून सायंकाळी 6.19 वाजेपर्यंत ग्रहण काळात श्रींवर जलाभिषेक करण्यात येईल. यावेळेत भाविकांचा कोणताही प्रसाद वाहिला जाणार नाही. भाविकांना दुरूनच श्रींचे दर्शन दिले जाईल. ग्रहण समाप्तीनंतर सायंकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे धुपारती होईल. त्यानंतर मंगळवारच्या सायंकालीन पूजेला सुरुवात होईल. संध्याकाळी 7.10 वाजता नियमित पूजेला सुरुवात होईल. त्यानंतर श्रींना महानैवेद्य दाखविण्यात येईल. रात्री 8.30 ते शेजारतीपर्यंत भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱयातून श्रींचे दर्शन देण्यात येईल. श्रींची शेजारती रात्री 11.45 वाजता होईल. त्यानंतर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येईल.