…आणि चार वर्षांनंतर तिला मृत वडिलांच्या मोबाईलवरून आला रिप्लाय

जवळच्या व्यक्तिच्या अचानक जाण्याने आयुष्यात कधीही न भरणारी पोकळी निर्माण तर होतेच. पण त्यांच्या आठवणीही आपल्याला व्याकुळ करतात. गेलेली व्यक्ती कधीही आपल्याला भेटू शकत नाही, बोलू शकत नाही हे आपल्याला ठावूक असतं. तरीही वेड मनं त्याची आस लावून बसतं. पण अमेरिकेतील एका तरुणीने चार वर्षांपूर्वी गेलेल्या वडिलांशी बोलायचच अशी आस लावली होती. आणि चक्क तिची इच्छा पूर्ण झाली. तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून चार वर्षांनी तिला रिप्लाय आला आणि तिचं जगचं बदललं.

अमेरिकेतील अर्कांससमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे नाव चॅस्टी पॅटरसन असून तिच्या वडिलांना जाऊन चार वर्ष झाले आहेत. पण वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या चॅस्टीला वडिलांची आठवण अस्वस्थ करते. यामुळे ती दरवर्षी वडिलांच्या स्मृतीदिनी त्यांच्या नंबरवर मेसेज पाठवते. पण त्यावर काहीही रिप्लाय येत नाही. 24 तारखेलाही तिने वडिलांना मेसेज पाठवला. त्यात तिने म्हटले की हॅलो डैड मी बोलतेय. उद्यचा दिवस पुन्हा खूप कठीण असणार आहे. तुम्हांला जाऊन चार वर्ष झाली आहेत. पम असा एकही दिवस जात नाही.जेव्हा तुमची आठवण येत नाही. मला माफ करा. कारण जेव्हा तुम्हांला माझी गरज होती. त्यावेळी मी तुमच्याजवळ नव्हते. यात चॅस्टी आपला अभ्याक्रम, कॅन्सरमुक्त होणं. यावर भरभरून लिहलं होते. पण तीन वर्षात या नंबरवरून तिला हाहीही रिप्लाय आला नव्हता.

त्यावर काहीही रिप्लाय येणार नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती शांत बसली होती. पण अचानक मेसेज टोन वाजली. तिने सहज म्हणून बघता त्यावर वडिलांच्या नंबरवरुन मेसेज आल्याचं तिने वाचलं. तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिला समोरच्या नंबरवरुन आलेला मेसेज हा तिच्या वडिलांनी नाही तर दुसऱ्या व्यक्तीने पाठवला होता. त्यात लिहलं होत. हाय स्वीटहार्ट, मी तुझा पिता नाही. पण मला तुझं मन दुखवायच नव्हतं. पण गेल्या चार वर्षात तू जे काही मेसेज पाठवतेयंस ते मी वाचले. माझ नाव ब्रॅड असून 2004 साली एका कार दुर्घटनेमध्ये मी माझ्या मुलीला गमावलं आहे. पण तुझे हे मेसेज मला आवडतात. कारण त्यांनीच मला जिवंत ठेवलंय. तू एक कणखर स्त्री आहेस. जर आज माझी मुलगी हयात असती तर कदाचित ती तुझ्यासारखीच असती. तुझ्या या अपडेटबद्दल आभार.

25 ऑक्टोबरला वडिलांच्या मोबाईलवरून आलेल्या या मेसेजने चॅस्टी खूपच भावूक झाली. तिने ते मेसेज सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या