वॉर्नरची निवृत्ती अजून दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस फॉर्मसाठी झगडत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने आता कसोटीतून निवृत्त व्हावे म्हणून दिग्गज क्रिकेटपटू त्याला सल्ला देत असले तरी या आक्रमक सलामीवीरापासून निवृत्ती अजून दूर असल्याची माहिती वॉर्नरच्या एजंटने दिली आहे.

ब्रिस्बेन कसोटीत वॉर्नर पहिल्या डावात भोपळाही पह्डू शकला नव्हता तर दुसऱया डावातही त्याला 3 धावाच करता आल्या होत्या. तसेच त्याच्या बॅटीतून 5, 48, 21 आणि 28 अशा खेळ्या केल्या होत्या. वॉर्नरने कसोटीतील शेवटचे शतक जानेवारी 2020 ला ठोकले होते. धावांसाठी झगडत असलेल्या वॉर्नरचा या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे एजंट जेम्स एर्स्पिनने सांगितले.

तो आगामी हिंदुस्थान दौऱयात आणि अॅशेस मालिकेत खेळणार आहे. तसेच 26 डिसेंबरला सुरू होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीत खेळून तो आपल्या कसोटींचेही शतक ठोकण्याच्या तयारीत आहे. गेल्या दहा डावांत वॉर्नरच्या बॅटीतून 21 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र लवकरच मोठी खेळी करेल, असा विश्वासही त्याने बोलून दाखविला आहे.