
खांद्याच्या दुखापतीने पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीतून माघार घेणारा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने मागर घेतली आहे. आता बोपण्णा याच्या पाठोपाठ युवा टेनिसस्टार शशी मुकुंद यानेही पायाच्या दुखापतीमुळे या लढतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदुस्थानी डेव्हिस चषक संघातील राखीव खेळाडू मुकुंद याला पोर्तुगालमध्ये स्पर्धा खेळताना दुखापत झाली. पूरव राजाच्या साथीने तो ही दुहेरीची स्पर्धा खेळत होता. त्यामुळे दुर्दैवाने मुकुंद संघासह कझाकस्तानच्या दौऱ्यावर नसेल, अशी माहिती हिंदुस्थानचे डेव्हिस चषक प्रशिक्षक झीशान अली यांनी दिली. दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेणारा मुकुंद हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी रोहन बोपण्णाला खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. मुकुंद ऐवजी एन. श्रीराम बालाजीचा संघात समावेश करण्याची शक्यता होती. परंतु इतक्या कमी कालावधीत व्हिसा प्रक्रिया होणे अशक्य आहे, असे झीशान यांनी सांगितले.





























































