डीसीपी श्रीरामेचा अटकपूर्व जामीन मंजूर

13

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

२२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी आज मंगळवारी प्रत्येकी ५० हजार रुपयाच्या दोन जामीनदारांवर सशर्त जामीन मंजूर केला.

२२ वर्षीय तरुणीने व्हाटसअॅपवर पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वे एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात श्रीरामे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून श्रीरामे यांनी ७ जूलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांच्या समोर सुनावणी झाली असता मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचे दोन जामीनदारावर जामीन मंजूर केला. मंगळवार, शनिवारी तपास अधिकाऱ्या समोर हजेरी लावावी आणि त्यांना तपासामध्ये सहकार्य करावे असे आदेशात नमूद करण्यात आले. मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांना अ‍ॅड. सिध्दार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या