रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारी मृत देवमासा आढळला

रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या समुद्रकिनारी मृत देवमाशाचे अवशेष आढळून आले आहेत. स्थानिक रहिवाशांना मिऱ्या समुद्रकिनारी तीव्र कुजकट वास येत असल्याने त्यांनी किनाऱ्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना पाण्यात आणि किनाऱ्यावर अत्यंत मोठ्या आकाराच्या मृत झालेल्या देव माशाचे अवशेष आढळून आले. हा देवमासा कधी मृत झाला आणि तो किनाऱ्यावर कसा आला, याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. या पूर्वीदेखील रत्नागिरी, मालगुंड आणि गणपतीपुळे यासारख्या समुद्रकिनाऱ्यांवर मृत समुद्री जीवांचे अवशेष आढळले आहेत.