देवणी येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

देवणी येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. दरम्यान, हे हत्येचे किंवा आत्महत्येचे प्रकरण असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच मृतदेहाची ओळख पटल्यास देवणी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.