जामखेडच्या जंगलात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह, एकच खळबळ

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील जंगलात अर्धवट जळालेला एक मृतदेह अढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

डोणगाव येथील जंगलात एका पुरुषाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे फॉरेन्सिंक तज्ज्ञ आणि पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री हा मृतदेह वनविभागाच्या जंगलात टाकलेला आढळला. त्याच्या तळहातावर ओम हे अक्षर गोंदलेले आहे. पायात पांढर्‍या रंगाचे सॉक्स घातलेले आहेत, अंगात आकाशी रंगाचे स्वेटर आहे व पांढऱ्या-काळ्या नक्षीचा शर्ट घातलेला आहे. पण त्यांची ओळख पटली नसून पुढील तपास पोलीस करीत आहेत.