लातूरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर ते कव्हा जाणाऱ्या रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आकस्मात मृत्यू या घटनेची नोंद लातूर ग्रामिण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृतदेहाची ओळख पटेली नाही.

लातूर ते कव्हा या रस्त्यावरील तळयाजवळच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.मयत हा ४५ ते ४७ वर्षाचा असावा. आप्पासाहेब नारायण देशमूख पोलीस पाटील कातपूर यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात सुचना दिली. त्यानुसार आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदरील व्यक्तीसंदर्भात अधिक माहिती असेल तर पोलीस नियंत्रण कक्ष, लातूर ग्रामिण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.