
देवगड बंदरातील विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवरून पडलेल्या खलाशाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला आहे. देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवर एकनाथ पांडुरंग शिवगण (वय 45, रा. मालगुंड, ता. रत्नागिरी) हा खलाशी म्हणून कामाला होता. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो बोटीवरून खाली पाण्यात पडला. त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही.
गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत सापडला आहे. याबाबतची माहिती त्याचा भाऊ संतोष शिवगण याने देवगड पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार राजन जाधव, पोलीस नाईक महेंद्र महाडिक करत आहेत.




























































