स्वाईन फ्ल्यूने सोलापूरात एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । केज

केज तालुक्यातील गोटेगाव येथील रामेश्वर श्रीकृष्ण बोराडे वय २५ वर्षे हे गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी होते. त्यांना ताप येत असल्याने त्यांली कळंब, बार्शी येथे उपचार केले पण गुण आला नाही म्हणून रामेश्वर बोराडे यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

वैद्यकीय अधिकारी यांनी रामेश्वर बोराडे यांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. बुधवारी रात्री गोटेगाव येथे अंत्यविधी करण्यात आला. रामेश्वर यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा व नातेवाईक असा मोठा परीवार आहे.