परतूरात युवकाचा मृतदेह सापडला; हत्या झाल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील तहसिल परिसरामागे असलेल्या शारजा मैदान म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेट मैदानावर शनिवारी दुपारी मोढा भागातील रहिवाशी कुदंन घनशाम खंडेलवाल या 20 वर्षीय युवकांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या युवकाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कुदंन खंडेलवाल हा प्रतिष्ठित व्यापारी आहे. या खुनाचे कारण अद्याप समजु शकले नाही. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यातच येथील लाल बहादुर डी.एड. कॉलेजच्या क्रिकेट मैदानात एका युवकाची हत्या झाली होती. ते प्रकरण शांत होत नाही तोच ही दुसरी घटना घडल्याने शहरातील नागरीकांनी, व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेचा निषेध करत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. शहरात अनेक सामाजिक कार्यक्रमात कुदंन याचा मोठा सहभाग होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह येथील ग्रामीण रूग्णलयात नेला आहे. शवविच्छेदन रविवारी सकाळी होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रंशात अंभुंरे यांनी दिली आहे. कुंदनच्या डोक्यात सळईने वार केल्याचे प्राथमिक अंदाजातुन व्यक्त होत येत आहे. या घटनेमुळे परतुरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.