इराणमध्ये लष्कराच्या परेडवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । तेहरान

इराणमध्ये लष्कराच्या परेडवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. येथील आह्वाज या शहरात ही घटना घडली असून या घटनेत अनेकजण मारले गेले आहेत तर २० जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये सैनिक आणि स्थानिकांचा समावेश आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ च्या सुमाराला ही परेड सुरू होती. इराकविरुद्धच्या युद्धाच्या स्मरणदिनानिमित्त देशात ठिकठिकाणी संचलनाचे कार्यक्रम सुरू होते. त्यातील आह्वाज येथील संचलनावर हा हल्ला झाला. दोन हल्लेखोरांनी लष्करी गणवेशात येऊन जवळपास १० मिनिटे लष्करावर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला इस्लामिक मिलिटंट्सनी केला असावा असा स्थानिक माध्यमांचा अंदाज आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं वृत्त आहे.

summary- deadly attack on military parade at iran