धक्कादायक! कर्जबाजारी शेतकऱ्याने पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीसह घेतला गळफास

15
suicide

सामना ऑनलाईन, नगर

कर्ज बाजारीपणामुळे अकोले तालुक्यातील चास गावातील एका तरुण शेतकऱ्याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केली आहे. पांडुरंग राधू शेळके (वय 31) , त्याची पत्नी सोनाली शेळके (वय 22) यांनी 2 वर्षांची मुलगी शिवन्या हिला देखील गळफास लावला. तो छोटासा जीव काय होतंय हे कळायच्या आतच वेदनादायी पद्धतीने जग सोडून गेला.पांडुरंग यांचे मित्र रात्री त्यांच्या घरी दूध आणण्यासाठी गेले होते. त्यांनी बराच वेळ आवाज दिला, मात्र आतून काही ऐकू न आल्याने त्यांनी दार ठोठावण्याचा प्रयत्न केला. दार उघडच असल्याने मित्र आतमध्ये गेले तेव्हा तिघांचे म-तदेह त्यांना दिसले. त्यांनी तातडीने न पोलिसांना कळवला. सेवा सोसायटीचे असलेले कर्ज,शेतीमालाला नसलेला बाजारभाव यामुळे पांडुरंगने हे पाऊल उचलल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या