डिसेंबर महिना डिजिटल मनोरंजनाचा, संजय दत्तच्या ‘टोरबाज’पासून भूमीच्या ‘दुर्गामती’पर्यंत…

अनलॉकच्या टप्प्यात 15 ऑक्टोबरपासून देशातील सिनेमागृहे अटीशर्तींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे मोठे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित करण्यात येत आहेत. 2020 सालच्या अखेरच्या महिन्यात सिनेमांसोबत काही वेबसीरीजही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. थोडक्यात काय तर डिसेंबर महिना डिजिटल मनोरंजनाचा असेल.

सिनेमा

  • 4 डिसेंबर रोजी ‘झी 5’वर ‘दरबान’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शारीब हाश्मी, शरद केळकर, रसिका दुग्गल आणि फ्लोरा सैनी यांच्या भूमिका आहेत.
  • 11 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी सिनेमांची टक्कर बघायला मिळेल. अॅमेझॉन प्राईमवर हॉरर थ्रिलर सिनेमा ’दुर्गामती’ प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये भूमी पेडणेकर, अर्शद वारसी, माही गिल, जिशू सेनगुप्ता आणि करण कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत.
  • ‘दुर्गामती’ला टक्कर द्यायला नेटफ्लिक्सवर संजय दत्तचा ‘टोरबाज’ प्रदर्शित होणार आहे.
  • झी 5 वर 11 डिसेंबर रोजी ’लाहोर काॅन्फिडेन्शल’ हा थरारपट प्रदर्शित होणार आहे.
  • 25 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईमवर वरुण धवन आणि सारा अली खान यांचा ’कुली नंबर 1’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

वेबसीरिज

  • 4 डिसेंबर रोजी अमेझॉन प्राईमवर ’सन्स ऑफ द सॉईल’ ही स्पोर्टस् वेबसीरीज येतेय. यामध्ये अभिषेक बच्चन याची कबड्डी टीम ‘जयपूर पिंक पँथर्स’चा प्रवास दाखवला आहे.
  • त्याच दिवशी नेटफ्लिक्सवर ’भाग बीनी भाग’ ही काॅमेडी सीरीज प्रदर्शित होईल. त्यामध्ये स्वरा भास्करची प्रमुख भूमिका आहे.
  • 11 डिसेंबर रोजी सोनी लिववर ’श्रीकांत बशीर’ वेबसीरीज प्रदर्शित होईल. दोन पोलीस अधिकारी श्रीकांत आणि बशीर यांच्यावर वेबसीरिज आधारित आहे.
  • 18 डिसेंबर रोजी ‘ब्लॅक विडोज’ वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये मोना सिंग, शमिता शेट्टी, स्वस्तिका मुखर्जी आदींच्या भूमिका आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या