परीक्षांबाबत लवकरच निर्णय- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत 

623

बारावी नंतरच्या सीईटी परीक्षा आणि युजीसीच्या परींक्षाबाबत मंगळवारी सर्व कुलगुरूंसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे, त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतर काही दिवसांत सर्वच परींक्षा बाबत निर्णय होईल, अशी माहिती  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजपासून सर्वांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी मिळालीय अशा प्रकारे रत्नागिरीत आज सकाळपासून बाजारपेठ आणि रस्त्यावर गर्दी झाली होती. याकडे आम्ही प्रशासन गांभीर्यांने पहात आहे. त्यामुळे रत्नागिरीतील बाजारपेठेत दुचाकी बंद करण्यात आलीत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

आरटीओ होम क्वारंटाइन -जिल्हाधिकारी

रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांच्या कुटूंबीयांना घेऊन रत्नागिरीत आले. त्यांनी स्वतःची तपासणी केली नाही, अशी ओरड सुरु होती. त्यावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट सांगितले की ते ग्रीन झोन मधून रत्नागिरीत आले आहेत आणि त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. पुढे मिश्रा म्हणाले की अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना सारखेच नियम आहेत. क्वारंटाईन क्षेत्रात कुणाला जाता येणार नाही आणि क्वारंटाईन क्षेत्रातून कुणी बाहेर जाऊ शकणार नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की,काल जे दोन रूग्ण सापडले ते संस्थात्मक क्वारंटाईन होते. त्यांच्या नातेवाईकांचेही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या