नाशिकच्या साहित्य  संमेलनाबाबत तीन दिवसांत निर्णय

नाशिक येथे येत्या 26 ते 28 मार्च रोजी होणाऱया 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संमेलन होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाबाबत येत्या तीन दिवसांत योग्य तो निर्णय होईल, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आज सांगितले. लोकांच्या आरोग्याशी तडजोड करून आम्हाला कोणतीही बाब करायची नाही, अशी पुस्ती त्यांनी पुढे जोडली.

आपली प्रतिक्रिया द्या