
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरील सद्यस्थितीचा अहवाल आणि त्यावरील निर्णय लवकरच दिला जाईल, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी परिषदेत दिली. शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी विधान परिषदेत 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत उपसभापती नीलम गोऱहे यांच्या अपात्रतेसंर्भातील मुद्दा उपस्थित केला.
गेली अडीच वर्षे यावर सुनावणी सुरू आहे. नियमाप्रमाणे 90 दिवसांत त्यावर निकाल अपेक्षित होता, परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे सद्यस्थिती त्याची काय आहे, असा सवाल परब यांनी केला. सभापती शिंदे यांनी त्यावर लवकरच स्टेटस रिपोर्ट आणि त्याचा निर्णयही दिला जाईल, असे आश्वासन दिले.