
टॉमेटोचे भाव सर्वसामान्यांच्याच नाही तर अगदी श्रीमंतांच्याही आवाक्याबाहेर गेले आहेत. टॉमेटोच्या किमती पाहून अनेकांनी टॉमेटो खाणे सोडून दिले आहे. मंध्यतरी सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी – कुंद्रा यांसारख्या मोठ्या कलाकारांनी देखील टॉमेटोच्या वाढलेल्या किंमतीवर भाष्य केले होते. आता टॉमेटोच्या वाढलेल्या दरांची झळ क्रिकेटपटूंनाही भासू लागली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू दिपक चाहर याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये दिपक चाहर पाळीव कुत्रा डंझोसोबत दिसत आहे. सुरूवातीला दिपकने “हा आहे डंझो , पूर्वी हा फक्त अंडी, पनीर, बदाम खात असे आणि टॉमेटो खात नव्हता, पण जेव्हापासून टॉमेटो 150-200 किलो रूपये झाला आहे, तेव्हापासून त्याने टॉमेटो खायला सुरूवात केली आहे. भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर आधी सगळ्या भाज्यांचे तो भाव विचारतो, त्यामध्ये जे सगळ्यात महाग असेल तेच तो खातो.” असे या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले आहे.






























































