
इंग्लंडमधील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बीसीसीआय पुढील आठवडय़ात संघ जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. पण त्याआधीच टी -20 स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज दीपक चहर याच्या तंदुरुस्तीबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे (हॅमर्स्टिंग) चहरला आयपीएल 2022 ला मुकावे लागले होते. दुखापतीतून सावरण्यासाठी तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता. वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत चहरला ही दुखापत झाली होती, पण तो अजूनही फिट झालेला नाही आणि त्यासाठी त्याला किमान पाच आठवडे लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड होणे अशक्यच आहे.























































