प्रशिक्षकांशिवाय खेळणाऱ्या, दीपिका कुमारीला कांस्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सॅमसन

हिंदुस्थानच्या दीपिका कुमारीने तुर्कीत सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी फायनलमध्ये प्ले ऑफ फेरीत लिझा उनरूला अटीतटीच्या झुंजीत नमवत कांस्यपदक पटकावले. 5 सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी साधल्यावर शूट ऑफमध्येही दीपिका आणि लिझा यांच्यात 9-9 अशी बरोबरी झाली, पण दीपिकाचा बाण केंद्रबिदूच्या अधिक जवळ असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले.

विशेष म्हणजे डेंग्यूतून सावरलेल्या दीपिकाने या विश्वचषक फायनलमध्ये प्रशिक्षकांशिवाय चमकदार कामगिरी नोंदवली. आशियाई स्पर्धेनंतर दीपिकाला डेंग्यूच्या तापाने ग्रासले होते. त्यातून सावरत तिने 15 दिवसांच्या सरावानंतर पुन्हा तिरंदाजी मैदानात पुनरागमन केले.

summary- deepika kumari won bronze medal