ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करून घे! जेव्हा दीपिका पदुकोणला मिळाला होता वाईट सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीपिका पदुकोण ही अभिनेत्री बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मॉडेलिंग विश्वातून अभिनयाच्या क्षेत्रात येऊन तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ती आज घडीला बॉलिवूडची सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

पण, तिचा हा प्रवास सहज सोपा नव्हता. मॉडेलिंग करत असताना आलेले अनुभव मिळालेले सल्ले यांच्याविषयीचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने केला. यात तिला मिळालेला सर्वोत्तम आणि सगळ्यात वाईट सल्ल्याचा उल्लेखही तिने केला.

यात सगळ्यात उत्तम सल्ला देणारी व्यक्ती म्हणून तिने अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला. दीपिका म्हणाली की, त्याने मला खूप चांगले सल्ले दिले आहेत. त्यापैकी सर्वोत्तम म्हणजे कामाविषयी दिलेला सल्ला. तो म्हणाला होता की, नेहमी त्याच लोकांसोबत काम करा ज्यांच्यासोबत तुम्ही खूप चांगला वेळ व्यतित कराल हे तुम्हाला माहीत असेल. कारण, जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट बनवता, तेव्हा समांतर पातळीवर तुम्ही तुमचं खरं आयुष्यही जगत असता. त्यामुळे त्या चित्रपटाच्या चांगल्या आठवणी आणि अनुभव तुमच्यासोबत राहतात, असं शाहरुखने सांगितल्याचं दीपिका म्हणाली.

आयुष्यातल्या सगळ्यात वाईट सल्ल्याच्या आठवणीविषयी दीपिका सांगते की, तिला 18व्या वर्षी एका व्यक्तिने खूप वाईट सल्ला दिला होता. दीपिकाने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी (स्तन रोपण शस्त्रक्रिया) करून घ्यावी असा सल्ला तिला मिळाला होता. मी हा सल्ला एका कानाने ऐकून सोडून दिला होता. त्यावेळी माझ्यात इतकी प्रगल्भता नेमकी कशी काय होती याचं मलाच आश्चर्य वाटतं, असं दीपिका म्हणाली आहे.