Photo – ये लाल इश्क..! लाल रंगाच्या गाऊनमध्ये दीपिकाचा किलर लूक

बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिका आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वाद आता समोर आला आहे.त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली ते म्हणजे तिच्या जबरदस्त लूकमुळे. दीपिकाने तिच्या या नवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दीपिका स्टॉकहोम (स्वीडन) येथे एका ज्वेलरी ब्रँडच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात दीपिका एका मोठ्या लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.

दीपिकाने या कार्यक्रमात लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड ज्वेलरीही परिधान केली होती.

या लूकमध्ये दीपिकाचे सौंदर्य़ खुलून दिसत आहे. दरम्यान हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने साईड पार्टेड हेअरस्टाईल केली आहे. यासोबतच मिनिमल मेकअप केला आहे.

दीपिकाचा या लूकचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

दीपिका आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी यांच्या तणावाचे वातावरण आहे. खरंतर, संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून काढून टाकले आहे. दीपिकाच्या अव्यावसायिक वागण्यामुळे आणि ‘स्पिरिट’ चित्रपटाची स्क्रिप्ट लीक झाल्यामुळे संदीपने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.संदीपने दीपिकाचे नाव न घेता आपला राग व्यक्त केला.