दीपिकाच्या जेएनयू भेटीवर स्मृती इराणींची प्रतिक्रिया, काय म्हणाल्या वाचा सविस्तर बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Smriti Irani Minister of Textiles

अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांची घेतलेली भेट चांगलीच वादग्रस्त ठरायला लागली आहे. तिच्या या भेटीवरून तिचे कौतुक करणाऱ्या तसेच टोकाच्या टीका करणाऱ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तिच्यावर टीका करणाऱ्यांच्या यादीत केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणींचाही समावेश झाला आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना स्मृती इराणी यांनी दीपिकाच्या जेएनयू भेटीबाबत त्यांचे मत व्यक्त केले.

स्मृती इराणी म्हणाल्या की ‘ज्याने कोणी दीपिकाच्या जेएनयू भेटीसंदर्भातील बातमी वाचली असेल त्यांना हे जाणून घेण्याची इच्छा असेल की ती आंदोलनकर्त्यांमध्ये का गेली होती. आमच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट नाहीये की दीपिका देशाचे तुकडे तुकडे व्हावेत अशी इच्छा असलेल्यांसोबत उभी राहिली. आमच्यासाठी आश्चर्याची बाब ही आहे की ज्यांनी महिला-तरुणींच्या गुप्तांगावर काठ्यांनी वार केले त्यांच्यासोबत दीपिका उभी राहिली.