
सामना प्रतिनिधी । देगलूर
साहणेगाव येथील नांदेड ते बिदर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाच्य धडकेत हरिण ठार झाल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून हरिणाचे हणेगाव येथे दहन केले.






























































