अख्खा पाकिस्तान ब्राह्मोसच्या रेंजमध्ये

‘ब्राह्मोस मिसाईल हे हिंदुस्थानच्या वाढत्या लष्करी क्षमतेचे प्रतीक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्राह्मोसने फक्त ट्रेलर दाखवला. प्रत्यक्षात अख्खा पाकिस्तानच ‘ब्राह्मोस’च्या रेंजमध्ये आला आहे,’ असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पाकिस्तानला दिला. लखनऊ येथील ब्राह्मोस एअरोस्पेस केंद्रात तयार करण्यात आलेल्या पहिल्या ‘ब्राह्मोस’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी राजनाथ बोलत होते.