जेएनयू वादात सन्नी लिओनीची उडी, हिंसाचाराविरोधात केलं विधान

1029

जेएनयू हिंसाचार प्रकरणावरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच या वादात दीपिका पदकोणनंतर अभिनेत्री सन्नी लिओनी हीने उडी घेतली आहे. सध्या जे काही सुरू आहे ते योग्य नसून हिंसेचा मार्ग न स्विकारता अहंकार बाजूला ठेवून चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन तिने इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना दिले आहे.

मी माझी प्रतिक्रिया देत नाहीये. पण सध्या जे काही सुरू आहे. ज्यासाठी लोक आपसात लढत आहेत. ते बघून असं वाटतय की खूप काही गोष्टी करणे आवश्यक आहे. आपल्यातील अहंकार बाजूला ठेऊन चर्चा करावी. हिंसाचाराचा मार्ग सोडावा. कारण त्याचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर होत नाही. तर संपूर्ण कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो. असे सन्नीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर सन्नीने ऑस्ट्रेलियातील भयंकर अग्नीतांडवावरही आपली मत व्यक्त केली आहेत. आपण सर्वनाशाचा मार्ग निवडला असून जगातील सर्वात सुंदर गोष्टींना आपण संपवत आहोत. असे सन्नीने म्हटले असून जगातील प्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळायला हवे. ज्या भूमातेने आपल्याला निर्सगाच्या रुपाने जीवनदान दिले आहे. त्यालाच आपण नष्ट करत आहोत. असा आरोपही सन्नीने केला आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या