निर्यातीत हिंदुस्थानला अच्छे दिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

निर्यातीत हिंदुस्थानने उत्तुंग झेप घेतली आहे. हिंदुस्थानचा व्यापार तब्बल 331 अब्ज डॉलरने वाढला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानच्या निर्यातीत नऊ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठीची आकडेवारीच केंद्र सरकारने जारी केली आहे. या आकेडीवारीवरून सरकारची कामगिरी चांगली झाल्याचे समोर आले आहे.

2013-14 मध्ये हिंदुस्थानने निर्यातीत 314.4 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. यंदा हिंदुस्थानने हा विक्रम मोडीत काढला आहे. फार्मा, रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीत झालेल्या वृद्धीमुळे ही वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक व्यापार क्षेत्रात मंदी असूनही हिंदुस्थानच्या निर्यात क्षेत्रात वाढ झाली आहे. जगातिक स्तरावर सध्या मोठमोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीतही हिंदुस्थानची कामगिरी उत्तम असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.