
दिल्लीमध्ये प्रदुषण आणि वाढत्या थंडीचा नागरिकांना जोरदार फटका बसत आहे. दाट धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुक पूर्णत: कोलमंडली आहे. सकाळी जवळपास 66 विमाने कॅन्सल करावी लागली आहेत. तर 60 हून अधिक ट्रेन्स नियमीत वेळेपेक्षा उशीराने धावत आहे. याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झाला असून गाडी चालवताना चालकांना समोरचा रस्ता अगदीच धुकट स्वरुपात दिसत असल्याने वाहनांचा वेग मंदावला आणि पूर्ण शहरामध्येच वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
हवामान विभागाने दिल्लीमध्ये धुक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला आहे. सकाळच्या सत्रात तापमान 12 अंश सेल्सिअसने घसरल्याची माहिती IMD ने दिली. हवामान बिघडल्याने दिल्लीमधील आधीच गंभीर असलेली हवेच्ची गुणवत्ता आणखी ढासळली. दिल्लीचा AQI गंभीर प्लस श्रेणीत घसरला असून AQI ने 456 चा टप्पा पार केला. तसेच अशोक विहार (500), नोएडा (454) या भागातील हवेची गुणवत्ता सुद्धा ढासळली असून गंभीर ते गंभीर प्लस श्रेणींमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आली आहे.



























































