लोकसभा निवडणुकीसाठीच बालाकोटचा हवाई हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळेच केंद्रातील भाजप सरकारने बालाकोट येथे हवाई हल्ला केला, असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी केला. त्या हवाई हल्ल्यात कोटय़वधी रुपयांचे एअरक्राफ्ट आपण गमावले. पायलट बचावून सुखरूप परतले हे नशीब म्हणायचे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानशी छोटे युद्ध घडवले जाईल हे आम्हाला ठाऊक होते, पण निवडणुकीच्या तोंडावर एअर स्ट्राईक करण्यात आला, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीला वातावरण अनुकूल आहे. सर्व पक्ष निवडणूक घ्यावी यासाठी आग्रही आहेत. असे असतानाही लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.