
दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर तपासाला वेग आला असून कश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरयाणाशी जोडलेले 200 डॉक्टर आणि वैद्यकिय विद्यार्थी एनआयएच्या रडारवर आहेत. जैश ए मोहम्मदची सदस्य असलेल्या डॉ.शाहीन हिच्या नेटवर्कशी संबंधित असलेल्यांचा तपास केला जात आहे. तपास यंत्रणांनी संशयितांची यादी तयार करुन प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर आणि विद्यार्थी डॉ. शाहीन, डॉ. उमर मोहम्मद आणि इतर आरोपींच्या संपर्कात होते आणि हे व्हाईट कॉलर मॉड्यूलचा भाग आहे का याचा तपास केला जात आहे. उत्तर प्रदेशातील जवळपास 200 डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. अटक केलेली डॉ.शाहीन हिचे पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये नेटवर्क होते. तिच्या संपर्कात पाकिस्तानी सैन्यातील डॉक्टरसह कश्मीरी अनेक डॉक्टर विद्यार्थी होते. उत्तर प्रदेशात काम करणारे कश्मिरी 200 डॉक्टर आणि वैद्यकीय डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शाहीन उत्तर प्रदेशातील जवळपास 30 ते 40 डॉक्टरांच्या संपर्कात होती.



























































