
भ्रष्टाचार करणाऱया 150 सरकारी विभागांवर सीबीआयने शुक्रवारी छापे टाकले. सर्वसामान्य आणि छोटय़ा व्यापाऱयांकडून लाच मागणाऱया सरकारी विभागांवर ही कारवाई करण्यात आली. यात रेल्वे, खाणकाम, वैद्यकीय, वीज, वाहतूक,जीएसटी, सरकारी बँकांचा समावेश आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदिगड, शीमला, चेन्नई, मदुराई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, नागपूर, पटना, रांची, गाझियाबाद, लखनौ, डेहराडून या शहरांतील विभागांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग पहल’ वर आधारित ही कारवाई करण्यात आली.


























































