‘चांद्रयान-2’ची योग्य दिशेने वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानची दुसरी चांद्रयान मोहीम आपल्या योग्य मार्गावर असून संशोधक यानाला पुढील कक्षेत नेण्यात यशस्वी झाले आहेत. सोमवारी अंतराळात झेपावल्यावर यान पृथ्वीपासून ठरावीक अंतरावर स्थिरावण्यात आले होते. याच कक्षेत असताना या यानाच्या कक्षेत बुधवारी दुपारी यशस्वीरीत्या बदल करण्यात आले.

आता 6 ऑगस्टपर्यंत या यानाची कक्षा आणखी एकदा बदलली जाईल, असे ‘इस्रो’च्या संशोधकांनी सांगितले. चांद्रयान अंतराळात 6 ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी फिरत राहणार आहे. यानंतर 3.84 लाख किलोमीटर प्रवास केल्यानंतर हे यान 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभूमीवर पोहचणार आहे. रॉकेटपासून विलग झाल्यानंतर यानातील सौर उपकरणे आपोआप सक्रिय होणार आहेत. बंगळुरू येथील इस्रोच्या कार्यालयातून या यानावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे.