
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेशमधील बोमडीला जवळ मंगळवारी ढगफुटी झाली. यावेळी आलेल्या पूरात 800 जण अडकले असून अनेकजण बेपत्ता आहेत. बचावकार्य सुरू असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
ढगफुटीमुळे पश्चिम कामेंग जिल्ह्यातील नाग मंदिर टेंगाजवळील कास्पी नाल्यानेही धोकयाची पातळी ओलांडली आहे. त्याजवळील आरसीसी पूलही पूराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यात चार घरं, मुलांचे एक वस्तीगृह आणि रेस्टॉरंटही उध्वस्त झाले आहे. पूराच्या पाण्यात अनेक कार आणि मोटारसायकल वाहून गेल्या आहेत. एप्रिल महिन्यातही बोमडीला येथे ढगफुटी झाली होती. त्यात अनेक गावे पाण्यात वाहून गेली होती. जोरदार व मुसळधार पावसाने या भागात रौद्ररुप धारण केले होते. यात अनेक घरं वाहून गेली होती.
ढगफुटी होताच या भागात तासभऱ जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरली असून जागोजागी पाणी साचले आहे. नाल्यांना नदीचे स्वरूप आले आहे.

























































