
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल कोरोनाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उद्या म्हणजे मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी होणार असल्याचे वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र डॉक्टरांनी चाचणीसाठी एक दिवस थांबण्यास सांगितले असल्याचे कळते. ज्यामुळे केजरीवाल यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी होणार असल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





























































