धोनी आगामी टी-20 वर्ल्ड कप खेळणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरून सध्या क्रिकेटवर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. वर्ल्ड कपच्या अखेरच्या लढतीत धोनी निवृत्त होणार, त्यानंतर तो मायदेशात निवृत्ती घेण्याची शक्यता वाटते अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकतो, अशी माहिती एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. तरीही या दुखापतीसह तो संपूर्ण स्पर्धेत खेळला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीनंतर धोनीने सर्व खेळाडूंशी डाव्या हातानेच हस्तांदोलन केले. त्याचा अंगठा काळा पडलेला स्पष्टपणे दिसत होता. वर्ल्ड कपपूर्वीची पाठीची दुखापत, आता झालेली आंगठय़ाची दुखापत, फिनिशरच्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात आलेले अपयश आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनी निवृत्ती घेईल असे वाटत होते, मात्र धोनी आगामी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे.