दिल्लीत सम-विषमचा नियम तोडल्यास 20 हजार दंड

163

दिल्लीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्लीत सरकार 4 ते 15 नोव्हेंबरदरम्यान सम-विषम (ऑड-इव्हन) नियमाचा वापर करणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या  वाहनचालकांना 20 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सम-विषय प्रयोगाचा नव्या कायद्यात समावेश केला आहे. सम-विषम नियमानुसार त्या दिवशी तशाच क्रमांकाच्या नंबरची वाहने रस्त्यावर धावतात. हा नियम तोडणाऱ्याला वाहतूक विभाग दंड करतो. या आधी जानेवारी आणि एप्रिल 2016मध्ये दिल्लीत सरकारने सम-विषम वाहन क्रमांकाचा प्रयोग केला होता. त्यावेळी नियम तोडणाऱ्याला दोन हजार रुपये दंड होता.

आपली प्रतिक्रिया द्या