दिल्लीत दोन दिवस‘पंचपक्वान्नांच्या पंगती’, उद्यापासून जी-20 शिखर बैठकीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची राजधानी दिल्लीत 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान जी-20 शिखर बैठक होत आहे. दिल्लीत 50 हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीत दोन दिवस पंचपक्वानाच्या पंगती उठणार आहेत. यासाठी प्रसिद्ध 120 शेफची मदत घेण्यात आली असून पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या 500 डिशेस बनवण्यात येणार आहेत. यात राजस्थानी, साऊथ इंडियन, पंजाबी, मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध डिशेसचा समावेश आहे.

पाहुण्यांसाठी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी कमीत कमी 500 डिशेस तयार करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने भिंडी मसाला, कढाई पनीर, दाल पंच मेल, ज्वारी मेथी, केर सांगरी, चक्की सब्जी, गुलाब जामूनची भाजी, पंजाबी स्टाईल आलू मटर, दमची दाल मखनी, रोटी, पराठा, नान, गार्लिक नान, चिज चिली, कांद्याचा पराठा, लसून आणि हिरव्या मिरचीची भाकरी, मक्का आणि बाजरीची भाकरी, चीज नान, लच्छ, पुदिना पराठा यांचा समावेश आहे.

स्ट्रीट फूड

देसी स्ट्रीट फूडमध्ये गोलगप्पे, पाणीपुरी, भेलपुरी, दही पुरी, सेव पुरी, जोधपुरी मिर्ची वड़ा, बिकानेरी दाल पराठा, पलाश, लिलवा कचौरी, आलू दिल खूश, पालक छोलेची टिक्की, जोधपुरी काबुली पुलाव थाली, चटपटी चाट, समोसे आणि वडापावचा समावेश आहे.

साऊथ इंडियन

उरुलाई वाथक्कल, मालाबारचा पराठा, इडली सांबर, ओनियन चिली उत्तपम, म्हैसूरचा डोसा, साधा डोसा यांचा समावेश आहे.

विदेशी फूड

डेन्मार्कमधील कुकंबर वॅलीश, कॅबेज, डेनिस ब्रेड रॉल, सिजलिंग ब्राउनी, हेजलनट, सिनमोम आइसक्रीम आणि डेनमार्क केकचा समावेश आहे.

मिठाई

मलाई घेवर, गुलाब चुरमा, बेसन चुरमा, पिस्ता कुल्फी, गोंदचा हलवा, नारंगी मालपुआ, श्रीखंड, केसर पिस्ता, खीर, गाजर हलवा, मोतीचूरचे लाडू, अखरोट-अंजीर हलवा, अंगुरी रसमलाई, ऍप्पल क्रंबलपाई, मलाई कुल्फी विथ फालुदा, दाल-बादामचा हलवा, मिश्री मावा, पिस्ता रोल, रागी बदाम पिन्नी, रागी पनियार, काकुम मठरी, निगेला कॅनोली, काजू मटर मखाना, एवाकाडो सलाद, नारंगी मालपुआचा समावेश आहे.