लाखो रुग्णांच्या माहितीचा गुगलकडून चोरी-छुपके वापर

552

सर्वोत्तम सर्च इंजिन म्हणून प्रचंड लोकप्रियता कमावणारी गुगल कंपनीही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमेरिकेच्या 21 राज्यांतील नागरिकांचा हेल्थ डेटा त्यांना न विचारताच चोरी-छुपके गोळा केल्याचा ठपका गुगलवर ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात लाखो रुग्णांचा अशाप्रकारे हेल्थ डेटा गोळा करून तो वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या कंपनीला दिल्याचे उघडकीस आले आहे.

गुगलने वैद्यकीय सेवा देणाऱ्या या ‘असेन्शन’ कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी अमेरिकेच्या २० राज्यांतील जवळपास १५० रुग्णालये चालवते. या रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांचा हेल्थ डेटा, त्यांची वैयक्तिक माहिती त्यांना न विचारताच गुगल क्लाऊडवर अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी असेन्शन कंपनीच्या काही कर्मचाऱ्यानीच या प्रकरणाचा उलगडा केला. गुगल आणि असेन्शन या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन वैद्यकीय सेवांमधील सुधारणेसाठी ‘नाइटेंगेल’ प्रकल्प हाती घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षभरात लाखो रुग्णांचा हेल्थ डेटा जमवला आहे. हा डेटा आपण रुग्णांची माहिती रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरत असल्याचे स्पष्टीकरण दोन्ही कंपन्यांकडून देण्यात  आहे.

ह रुग्णांचा हेल्थ रेकॉर्ड वाचण्यासाठी गुगल आणि असेन्शन यांच्या प्रकल्पांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. यामुळे आजारपणाशी संबंधित माहिती गोळा करण्यात मदत होते तसेच उपचार प्रभावीरित्या करणे शक्य होते, असा दावा कंपन्यांकडून करण्यात आला.

अमेरिकेच्या २१ राज्यांतील ‘हेल्थ डेटा’च्या सुरक्षेबाबत चिंता

गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

असेन्शन कंपनीमार्फत गोळा करण्यात आलेल्या माहितीमध्ये रुग्णाचे नाव, वय, जन्मतारीख, मेडिकल हिस्ट्री, वैद्यकीय तपासणीचा अहवाल, उपचार आणि औषधांच्या तपशीलाबरोबरच रुग्णालयात किती वेळा दाखल करण्यात आले, याचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये रुग्णांचा तपशील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणाऱ्या या कंपन्यांना पुरवण्यास परवानगी आहे. परंतु, दोन्ही कंपन्यांनी खासगी माहितीचा वापर आणि गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अमेरिकेतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या