पाकडे हादरले, हिंदुस्थानने क्लस्टर बॉम्बने हल्ला केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दहशतवाद्यांविरोधात हिंदुस्थानने कडक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने पाकडे चांगलेच हादरले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी हिंदुस्थानने पाकिस्तानी सीमेवर क्लस्टर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर हिंदुस्थानने हा आरोप फेटाळून लावला आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबरोबरच घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग असल्याने सुरक्षा दलाने दहशतवादाविरोधात ठोस पाऊल उचल्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दलाने सुरू केलेल्या शोध मोहिमेमुळे दहशतवाद्यांचा पाठीराखा असलेला पाकिस्तान चवताळला आहे. यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी सीमेवर क्लस्टर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप त्याने केला आहे. तर पाकिस्तानकडून अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून त्यास जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत असे सुरक्षा दलाने ठणकावून सांगितले आहे.