चांद्रयान-3 ची तयारी सुरू

609

चांद्रयान-2 या महिमेला अपेक्षित य़श न मिळाल्याने हिंदुस्थानची अंतराळ संस्था इस्त्रोने चांद्रयान-3 ची तयारी सुरू केली आहे. पण चांद्रयान-3 च्या लँचिंगला तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण या मोहिमेसाठी आवश्यक असलेले लँडर,रोवर, रॉकेट आणि इतर उपकरणं बनवायला त्यांना विकसित करायला अधिक अवधीची गरज आहे.

इस्त्रोच्या अहमदाबाद येथील केंद्रातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या कुठल्याही उपकरणाला तयार होण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यानुसारच चांद्रयान-3साठी लागणाऱ्या उपकरणांवर तीन वर्ष संशोधन केले जाणार आहे. त्यानंतर त्याचे डिझाईन तयार केले जाईल. नंतर त्या उपकरणाच्या विकासावर काम केले जाईल. चांद्रयान-3 च्या लँडरमध्ये चार आणि रोवरमध्ये 2 जुने उपकरणंही बसवण्यात येणार आहेत. ही सर्व उपकरणं विकसित करण्यास कमीत कमी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या