‘के-4’ अणू क्षेपणास्त्र पाण्याखालून करणार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 3500 किमीवरील शत्रूंवर पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘के-4’ अणू क्षेपणास्त्रची 8 नोव्हेंबरला विशाखापट्टणमच्या किनाऱयावर चाचणी केली जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) पाण्याखाली तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवरून ही चाचणी करणार आहे.

यापूर्वी 700 किमीपर्यंतच्या अंतरावरील शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता असलेले ‘बीओ-5’ क्षेपणास्त्र बनवण्यात आले होते. ‘के -4’ अणू क्षेपणास्त्रची गेल्या महिन्यात चाचणी घेतली जाणार होती परंतु काही कारणास्तक चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. डीआरडीओ पुढील काही आठवडय़ांत ‘अग्नी-3’ आणि ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचीही योजना आखत आहे.

 अरिहंत क्लास अणू पाणबुडय़ांसाठी डिझाईन केलेले ‘के-4’ हे हिंदुस्थानचे दुसरे अंडरवॉटर मिसाईल आहे.

 सशस्त्र पाणबुडी असलेल्या देशांच्या यादीत हिंदुस्थानचा सहावा क्रमांक लागतो.

 हिंदुस्थानात बनवलेली ‘आयएनएस अरिहंत’ ही पहिली अण्कस्त्रधारी पाणबुडी ऑगस्ट 2016 मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती.